LOADING

Type to search

ए जाडे

284 Views
Share
ए जाडे

सोनम तिच्या खोलीत मॅगझिन चाळत बसली होती. एवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला.

जाडी महिला: डॉक्टर, माझ वजन कमीच नाही होत. सगळे उपाय करुन बघितले.
डॉक्टर: ठीक आहे. उजवीकडे बघा, आता डावीकडे बघा. अस करत रहा, जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणी तेलकट, चमचमीत खायला देतील तेव्हा अशीच मान हलवत रहा. लगेच वजन कमी होइल.

सोनम ला मेसेज वाचून खूपच राग आला. तिने लगेच तिच्या आई ला फोन केला, ” तुला अजून काही काम नाही का ग आई. मला माहित आहे मी जाड आहे. अस सारखे मेसेज नको करुस. मला त्रास होतो.” आई हसत बोल्ली, ” तू जाड झाली आहेस, आधी नव्ह्ती. जेव्हा पासून घरातून बाहेर गेलीस तेव्हा पासून तुझं वजन भराभर वाढत गेल. तू अजून लहान आहेस.
मला काळजी वाटते म्हणून बोलते. सोनम तू व्यायाम चालू कर… जास्त नाही करायचा ग आर्धा तास जरी रोज चाललीस तरी पुरेसे आहे आणि बाहेरच आजीबात खाऊ नकोस. ऑफिस मधून एवढा वेळ तर नक्कीच काढू शकते तू.” आई च बोलणे ऐकून सोनम त्रस्त झाली, ” ठिक आहे. बघते मी. ठेव आता तू. “

सोनम २२ वर्षांची खूप हुशार मुलगी होती, शिक्षण पूर्ण करून एका मोठ्या कंपनीच्या ह्युमन रिसोर्स टीम मधे कामाला लागली होती. पहिलाच जॉब म्हणून ती मेहनत घेत होती, जेवायच्या वेळा चुकवू लागली मग भूक लागेल तेव्हा पोटभर जंक फुड वर जोर. कामात इतकी व्यस्त कि झोपायचा नियम राहिला नाही. सकाळी उठली कि पळाली, ना निट नाष्टा ना व्यायाम.

एक दिवशी टिम मीटिंग मधे नवीन बॉस च इंट्रोडक्शन झाल. इतका देखणा बॉस बघून सोनम गालातच हसली, का कुणास ठाऊक  तिला तो खूप आवडला. मध्यम बांधा, धारधार नाक, कुरळे केस, मनमोहक स्माईल.
सोनम आता रोज ऑफिस ला नीट तयार होऊन यायला लागली, कानात झुमके, मॅचिंग चप्पल, हलका मेकप. पण विपुल सर ने अजून तरी सोनम ला नोटीस नाही केल. दोन महिने झाले पण सोनम आणि विपुल सर काही समोरासमोर आलेच नाही.   पुन्हा टीम मीटिंग होती, सोनम ने ठरवले आज तर विपुल सर सोबत बोलायचे आणि त्यांना इंप्रेस करायचे. पण नेमकी आज तिला ट्रॅफिक भेटली आणि मीटिंग ला उशिर झाला.
सोनम मीटिंग रुम मधे जाणार इतक्यात तिने संवाद ऐकला, विपुल सर कोणाशी तरी बोलत होते, ” त्या जाड्या मुलीने अजून मंथली रिपोर्ट नाही पाठवला, तिला सांगा मन लाऊन काम करायला.” सोनम हादरली, ज्या व्यक्ती वर तिने मनापासून प्रेम केल त्याने फक्त तिचा लठ्ठपणा बघितला!एवढा शिकलेला असून सुद्धा अशे विचार कसे त्याचे?
तिचा खूप मनस्ताप झाला, आईचे शब्द आठवले, आजच्या जगात फक्त अंगी गुण असून चालत नाही, स्वतःला मेंटेन ठेवणे गरजेच आहे. आपण कितीही हुशार असलो तरी आपल दिसणे आणि रहाणीमान वर आप्ल्याला जज केल जात. कोणा साठी नाहीतर आपण स्वतः साठी नीट रहायलाच पाहिजे.
सोनम ने आई ला फोन केला, ” मला पुन्हा ते योगप्रकार चे व्हिडिओ पाठव ना, उद्या पासून सुरू करते. आणि ज्युस आणि सुप चे रेसिपीज पण पाठव.” आई हसतच बोल्ली, ” लगेच पाठवते बाळा.”

0 Comment

  1. Sarang Dev January 17, 2020

    Awesome

    Reply
  2. Diary of a housewife January 17, 2020

    Thank you dear

    Reply
  3. Unknown January 17, 2020

    Bharii ♥️

    Reply
  4. Diary of a housewife January 18, 2020

    Thankyou

    Reply
  5. Unknown January 18, 2020

    Lovely……very beautiful story

    Reply
  6. Unknown January 18, 2020

    Excellent write up. keep it up!

    Reply
  7. Diary of a housewife January 18, 2020

    Thank you so much

    Reply
  8. Diary of a housewife January 18, 2020

    Thank you so much

    Reply

Leave a Comment Unknown Cancel Comment