LOADING

Type to search

होकार ?

1002 Views
Share
” मला भेटायच आहे रुचिताला,” आई विक्रमला बोलली. ” कोण रुचिता? काय बोलतेय? काही समजल नाही मला,” विक्रम गोंधळून गेला. ” तुला काय वाटल आईला कधी समजणार नाही? तुझे रोज उशिरा येणे, घरी आल्यावर सतत फोन वर असणे, आणि काही दिवसांपूर्वी तु चुकून मला मेसेज केला, ‘ रुचिता ऑफिस नंतर भेटू रोजच्या कॅफे मधे’ तुला समजले नाही कि तो मेसेज तु मला केलास. पण हरकत नाही, त्यामूळे मला हे तर समजले कि मुलीचे नाव काय आहे,” विक्रमची आई हसत बोलली. ” काय आई तु पण! घरी बोलावू? बाबाला चालेल का? ” ” चालेल काय.. पळेल. विसरु नकोस आमचे पण प्रेमविवाह आहे,” अस म्हणत आई लाजली. ” हो माहित आहे ग पण आमच थोड वेगळ आहे. मला वाटते तु आधी माझ ऐकून घे,” विक्रम जवळच असलेल्या खुर्चीवर बसून बोलला. ” काही नाही हा, उद्या रविवार आहे. मला, बाबांला आणि तुला पण सुट्टी आहे, रुचिताला दुपारी जेवायला बोलाव,” आईने हट्ट धरला. ” चायनीज बनवू का? आवडेल का तिला?” आईने विक्रमला विचारले. थोडा हरवलेले होता विक्रम, आईने पुन्हा विचारले पाठीवरुन हात फिरवत. ” हो हो आवडेल ना, तुझ्या हातचे चायनीज मला आणि बाबांना खूप आवडत, तिला सुद्धा आवडेलच,” विक्रमने आईचे गाल ओढत उत्तर दिले.

दुसऱ्या दिवशी जस ठरल तस रुचिता विक्रमच्या आई बाबांना भेटायला येणार होती. विक्रम तिला घ्यायला रेल्वे स्टेशनवर गेला. विक्रमच्या आईने जेवण तयार करुन ठेवले आणि ड्रेस बदलून तयार झाली. विक्रमच्या बाबाने सुद्धा घर आवरायला मदत केली आणि हॉल मधे पेपर वाचत बसले. आर्ध्या तासाने विक्रम रुचिताला घेउन आला, रुचिताने पायातील सॅंडल काढुन लगेच विक्रमच्या आई- वडिलांचे दर्शन घेतले. आई तर खूप खुश झाली, संस्कार आहेत मुलीवर, त्या मनातल्या मनात बोलल्या. रुचिता सोफ्यावर बसली, विक्रमच्या बाजूला, जरा घाबरलेली होती. विक्रमने तिचा हात हातात घेतला,” डोंट वरी. ” एवढ्यात आईने सगळ्यांसाठी सरबत आणला, ” काकू कश्या आहात तुम्ही? तुमच्या शाळेला ‘ बेस्ट स्कूल ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाल्या बद्दल तुमचे अभिनंदन, ” रुचिताने ग्लास हातात घेतला. ” धन्यवाद रुचिता. सरबत घे पिउन.” आई तिला निर्खत होती, तिची स्माइल खूप आवडली त्यांना. ” तुझ्या बद्दल थोड सांगशील रुचिता?” बाबांनी विचारले. ” माझ नाव रुचिता श्रिरंग पवार. वडिलांची गाड्यांची स्पेअर पार्ट्स बनवायची फॅक्टरी आहे, आई घरीच असते आणि घरुन पप्पांच बॅंकेचे काम बघते. लहान बहीण आहे, ती एम. बि. बि. एस करते. माझा जन्म कोल्हापूरचा, मामा तिकडे असतात माझे. मुंबई युनिव्हर्सिटी मधून एम. बी. ए. केल आहे. सध्या डाबर कंपनीत विक्रमच्या टीम मधे मॅनेजर आहे. पगार… ” ” अग बस बस,” आईने मधेच थांबवले. ” आधी जेवण करुयात?” आईने सर्वांना विचारले. सग्ळ्यान्ना भूक लागली होती, हात धुवून लगेच बसले. रुचिता काकुंला मदत करत होती. मनात जे आहे ते कस सांगू.. काही समजत नव्ह्त. जेवण तस हसतखेळत झाल. ईकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. सगळ्यांना आईसक्रिम देउन आईने विक्रमचा हात हातात घेतला, ” मला आणि तुझ्या बाबाला आवडली आहे रुचिता. तो बात पक्की करे?” ” आई तुम्हाला अजून काहीतरी सांगायचे आहे. थोड गंभीर आहे. तुम्ही बसता का जरा?” विक्रमने आईला बसवले खाली. ” आई मला रुचिता खूप आवडते आणि तिलाही मी. आम्हाला लग्न तर करायचे आहेच, तिच्या घरातुन होकार आला आहे पण तुमचा अजून बाकी आहे.”  ” अरे मी आत्ताच तर बोलले तुला आम्हाला आवडली म्हणून, आजकाल काही नवीन कराव लागते का” आईने जरा संभ्रमित होत विचारले. ” आई रुचिताच हे पहिल लग्न नसणार आहे. ४ वर्षांपूर्वी तिच लग्न लावून दिल होत तिच्या घरच्यांनी, नीट विचारपूस करुन. पण लग्नाच्या एक आठवड्यात रुचिताला समजले कि,त्या मुलाचे दुस्र्याच मुलीवर प्रेम आहे. हे सगळ ती सहन नाही करु शकली आणि घरच्यांची मदत घेउन ते वेगळे झाले. जेव्हा रुचिता सोबत काम करु लागलो तेव्हा ती मला आवडायला लागली, जेव्हा माझ्या मनातल मी तिला व्यक्त केल तेव्हा तिने साफ विरोध केला. २-३ वेळा पुन्हा विचारल्यावर तिने हा प्रकर सांगितला. ते ऐकून आधी खूप वाईट वाटल पण मग लक्षात आल कि रुचिताने धीर नाही सोडला, ती उभी राहिली स्वतःसाठी. स्वतः सावरली आणि घरच्यांना सुद्धा खंबीर केल. तिच्यासाठी जे होत ते प्रेम आणखीन वाढल, तिचा अभिमान वाटू लागला. रुचिताला पण हळूहळू मी आवडू लागलो, आणि आता आम्ही दोघे लग्न करु इच्छितो, ”  विक्रमने सगळ आई बाबाला सांगितले. आई विचारात पडली होती. थोड्यावेळाने तिचा ह्या स्थळाला नकार आहे हे स्पष्ट सांगुन दिले. पण विक्रमच्या बाबांना त्याच बोलण पटल होत. रुचिताची किंवा तिच्या घरच्यांची ह्यात काहीच चूक नव्हती. त्यांना तर सहानूभूती ऐवजी रुचिताचा आणि स्वतःच्या मुलाचा अभिमान वाटत होता. रुचिता हुशार, कर्तुत्ववान, सुसंस्कृत आणि प्रेमळ मुलगी आहे.
विक्रमच्या बाबांनी रुचिताला घरी जाण्यास सांगितले आणि बोलले, ” मला तु आवडलीस बाळा. तुला मी सून म्हणून स्विकारले आहे, विक्रमच्या आईला मी तयार करतो. आता तुझ्या घरी सांग तयारीला लागा आम्ही तुमच्या घरी येतो पुढच्या महिन्याच्या १९ तारखेला बोलणी करायला.” ” पण काका माझी आई बोलत होती कि लग्न आपण साध्या पद्धतीने करु, लोक बोलतील ह्यांना लाज नाही वाटत मुलीचे दुसर लग्न पण इतक्या थाटात लावतात,” रुचिताचे डोळे पाणावले. ” हे बघ लोकांच काम आहे बोलणे. तुमच प्रेम आहे ना? साथ द्याल ना एकमेकांना? मग जळू देत लोकांना!!” विक्रमच्या बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

पुढच्या १९ तारखेला विक्रमच्या आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाला बाबांनी आईला नवीन साडी घेतली, तिला देत ते बोलले, ” शुभा २८ वर्षांपूर्वी जर आपल्याला घरून पाठिंबा मिळाला असता तर आपले सुरुवातीला हाल नसते झाले आणि आपण आपल्याच घरच्यांना परके नसतो झालो. विक्रमला आपण होकार दिला पाहिजे. रुचिताचा भूतकाळ विसरुन जा, तुला मुलगी आवडली ना मग अजुन काय पाहिजे आपल्याला.” ” खर आहे तुमच, चला भेटून येउ आपल्या होणाऱ्या सुनेला. एक नवीन साडी पण घेऊ तिच्यासाठी.” विक्रम आई- बाबाला हसत बघून खूप खुश झाला.

Previous Article

27 Comments

  1. SHALAKA March 13, 2020

    Khup chan

    Reply
    1. Archana April 7, 2020

      Thank you

      Reply
  2. Unknown March 13, 2020

    Mast

    Reply
    1. Archana April 7, 2020

      Thank you

      Reply
  3. Unknown March 13, 2020

    खूप छान विषयावर लिहिलेस अर्चना. प्रत्येकाला दुसरी संधी मिळणे आवश्यक आहे.

    Reply
    1. Archana April 7, 2020

      Ho khara aahe. Thank you

      Reply
  4. Deepesh March 13, 2020

    छान लिहिले आहेस… असंच लिखाण चालू राहो ही शुभेच्छा!

    Reply
  5. Socialspaark March 13, 2020

    Very nice

    Reply
  6. Diary of a housewife March 13, 2020

    Thank you

    Reply
  7. Diary of a housewife March 13, 2020

    Thank you

    Reply
  8. Diary of a housewife March 13, 2020

    Thank you very much

    Reply
  9. Diary of a housewife March 13, 2020

    Thank you very much

    Reply
  10. Diary of a housewife March 13, 2020

    Thank you

    Reply
  11. Unknown March 14, 2020

    खूप छान..पारंपरिक बदलतेय, बादलायला हवी हे सांगणारे लेखन👌🏼👍

    Reply
  12. Unknown March 14, 2020

    Mastt…

    Reply
  13. Diary of a housewife March 15, 2020

    Thank you so much

    Reply
  14. Diary of a housewife March 15, 2020

    Thank you

    Reply
  15. Pranali March 15, 2020

    mast

    Reply
  16. Priya March 15, 2020

    Revolution in thoughts and actions is must. Khup chan lihil ahe.

    Reply
  17. Unknown March 16, 2020

    Beautiful story…..

    Reply
  18. Diary of a housewife March 16, 2020

    Thank you very much

    Reply
  19. Diary of a housewife March 16, 2020

    Thank you so much

    Reply
  20. Diary of a housewife March 16, 2020

    Thank you dear

    Reply
  21. NEWSNBLOGS March 18, 2020

    Thank you very much for this informative post. Coronavirus is not stopping we need to take basic measures to prevent from coronavirus.

    Reply
  22. Diary of a housewife March 18, 2020

    ???

    Reply
  23. Guess who April 7, 2020

    Good one

    Reply
    1. Archana April 7, 2020

      Thank you

      Reply