LOADING

Type to search

हाऊस हसबंड

977 Views
Share

१०व्या मजल्यावरच्या केसकर काकु आणि ९व्या मजल्यावरचा शिरीष एकत्र लिफ्ट मधे आले, “मग आज काय पार्टी आहे वाटतं घरी!” काकुंनी शिरीषला पिशवीतलं सामान बघून विचारलं. “हो काकु! आज सीमा रिटर्न येते. ऑस्ट्रेलियाला गेली होती कामानिमित्त ६ महिन्यांसाठी. काल रात्रीच तिचा फोन आला, तीला प्रोमोशन मिळालं आहे, तिच्या कंपनीने तिला वाईस-प्रेसिडेंट म्हणून नेमलं आहे. मला वाटलं तिला सरप्राईस दिलं पाहिजे, तुम्ही सुद्धा या रात्री काकांना घेऊन,” शिरीषने खुश होऊन उत्तर दिले आणि लिफ्ट मधून निघाला.

“काय हा मुलगा, २ वर्ष झाले खुशाल घरी बसून बायकोच्या कमाई वर जगतोय. तिला सुद्धा लाज नाही, मुलांना नवर्याच्या जीवावर सोडून हिंडत असते इकडे तिकडे. ही आजकालची पिढी….” बोलत काकु देखील लिफ्ट मधून बाहेर पडल्या.

शिरीष आणि सीमाचा सुखाचा संसार होता, त्यांच्या २ गोड मुली सुद्धा होत्या, मोठी १० वर्षांची आणि छोटी ७ वर्षांची. सीमा खूप मेहनती होती, तिला जोडीदार देखील तसाच मिळाला होता, १२ वर्षांचा संसार एकदम सुखाचा सुरु होता, पण जशी कोणाची नजर लागली त्यांच्या कुटुंबाला आणि शिरीषची नोकरी गेली, देवकृपेने सीमाची नोकरी व्यवस्थित सुरु होती. नोकरी गेल्यावर काही महिने शिरीष डिप्रेशन मधे होता, पण सीमाने त्याची साथ नाही सोडली. सतत त्याच्याशी गप्पा मारायची, मुलींना देखील सांगून ठेवला होतं तिने कि शिरीषला कधीच एकटं सोडायचं नाही आणि कायम काहीतरी करून गुंतवून ठेवायचं. सकाळी मुली शाळेत जायच्या, दुपारी त्या घरी येई पर्यंत सीमा घरूनच काम करायची, मग दुपारी ऑफिसला जायची. हळूहळू शिरीष सुद्धा नॉर्मल झाला, मुलींचा अभ्यास घ्यायचा, खेळायला घेऊन जायचा, कधी त्यांच्या सोबत घर-घर खेळायचा. पण जिकडे तो त्याच्या लेकींना घेऊन जायचा, तिथे तिथे त्याला एकच प्रश्न विचारला जायचा, “मुलींची आई कुठे आहे?” सुरुवातीला तो चिडायचा, लोकांच्या खोचून बोलण्याचा त्याला राग यायचा! ज्या प्रकारे आई मुलांची सर्व जबाबदारी पार पाडते तसच एका वडिलाने केलं तर त्यात अचंबित होण्या सारखं काय आहे?

दुपारचा स्वयंपाक सीमा बनवून जायची, संद्याकाळी तिला यायला मात्र उशीर होयचा. रात्रीच्या जेवणासाठी एक मावशी यायच्या, शिरीषने त्यांच्याकडून सर्व स्वयंपाक शिकून घेतला होता, आता तोच रात्रीचं जेवण बनवायचा. लेकींची रोज काहीतरी वेगळीच फर्माईश असायची, आणि शिरीष मन लावून सगळं बनवायचा. स्वयंपाकघर सुद्धा आवरून ठेवायचा. सीमा घरी येई पर्यंत, मुलींचा अभ्यास, स्वयंपाक आणि उद्या सकाळ साठीची शाळेची तयारी सगळी झालेली असायची.

शिरीषची नोकरी जाऊन एक वर्ष झालं होतं, आता सर्व सुरळीत सुरु होत. शिरीषची खूप वर्षांपासून इच्छा होती स्वतःचा काही बिझनेस असावा, सीमा सोबत त्याचं बोलणं झालं, तिने तिचा पूर्ण पाठिंबा आहे असं सांगितलं, पण त्यासाठी भांडवल उभं करावं लागणार होत, कोणाची मदत घ्याची नाही असं शिरीषने ठरवले होते. मग काय रिसर्च सुरु झालं, मार्केट मधे सध्या काय हालचाल आहे, सगळ्यांचा शिरीष अभ्यास करू लागला, आणि हे सर्व घर सांभाळून करत होता. सीमाचा पण नवीन प्रोजेक्ट सुरु झाला होता, तिला घरी यायला उशीर होयचा. घरातला किराणा, भाजीपाला, मुलींची शाळा, डॉक्टर किंवा  कोणत्याही गोष्टी शिरीष बघायचा. पण जिकडेही जायचा लोक त्याला दयेच्या नजेरेने बघायचे, आता तर शिरीष बोलायचा सुद्धा, “मी हाऊस- हसबंड आहे.” असं ऐकून लोक अजून प्रश्न विचारायचे, म्हणजे काय? त्यावर शिरीषने रामबाण उत्तर शोधलं होत, “माझी बायको पैसे कमवून आणते आणि मी घर चालवतो. ती ऑफिसला जाते आणि मी घर सांभाळतो.” तो इतक्या सहजपणे उत्तर द्यायचा कि समोरची व्यक्ती अजून काही प्रश्न नाही विचारायची.

सीमा ऑस्ट्रेलियाहून संद्याकाळी घरी आली, लिफ्ट मधे केसकर काकु भेटल्या, “आलीस तु ! किती दमला होता ग शिरीष, घरातली तुझी कामं करून अर्धा झालाय बिचारा, जरा लक्ष देत जा घरात सुद्धा.” त्यांच हो बोलणं सीमाला लागलं. दरवाज्याची बेल वाजवली तर तिच्या मोठ्या मुलीने दरवाजा उघडला आणि तिला घट्ट मिठी मारली. सीमा घर बघतच बसली, “काय केलंय तुम्ही? घर किती सुंदर सजवलंय! काय स्पेशल आहे?” “मम्मी, तुझं अभिनंदन, पप्पाने पार्टी ठेवली आहे तुझ्यासाठी!” तिची छोटी लेक उड्या मारत बोलली. “कश्यासाठी शिरीष हे सगळं?” सीमाने शिरीषला विचारलं. “कशासाठी काय? तू इतकी मेहनत केलीस, मन लावून काम केलंस म्हणून तर तुला प्रोमोशन मिळालं ना! मग सेलिब्रेशन झालच पाहिजे!” शिरीषने सीमाचा हात हातात घेतला. “पण मी एकटीने हे नाहीच केलय. तुझी साथ नसती तर मी काहीच करू नसते शकले. तुझा सपोर्ट मला मिळाला म्हणून हे सगळं झालं.” सीमाने शिरीषचा हाथ घट्ट धरला. “सीमा मला माझ्या बिझनेससाठी इन्वेस्टर्स मिळाले आहेत. पण मी विचार करतोय, मी पार्ट टाईम करेल. बाकी वेळ मला घरी द्यायचा आहे. मी नशीबवान आहे कि मला माझ्या मुलींसाठी इतका वेळ मिळतोय, तू तुझं काम असच सुरु ठेव. मी काही वेळ बिझनेसला देईल बाकी वेळ घरी. मुली कधी मोठ्या होतील आणि घरटं सोडून जातील समजणार देखील नाही,” सीमा थोडी गोंधळली, “अरे पण कशाला, आपण दोघे फुल टाइम करू, घरकामासाठी नोकर ठेवूयात ना, कश्याला असा त्याग करतोस?” “नाही सीमा. मी पूर्ण विचार केला आहे. मी खुश आहे हाऊस-हसबंड म्हणून. लकी आहे मी!”

एवढ्यात दरवाज्याची बेल वाजली, केसकर काका आणि काकु आले पार्टीसाठी. “अरे वाह! काय मस्त सजवलं आहे घर शिरीष, काही बायकांना सुद्धा इतकं सुंदर घर आवरायला नाही जमत,” काकूंनी टोमणा मारून सीमेकडे बघितलं. “धन्यवाद काकु, सीमाची नोकरी स्थिर नसती ती तर मी काहीच करू नसतो शकलो, ती आहे म्हणून घर वाचलं आमचं नाहीतर आजकालचे शेजारी आणि नातेवाईक तोंडावर दार बंद करतात, दुसऱ्यांवर टीका करायला संधीच शोधात असतात. कुठे हात पसरवले असते आम्ही?” शिरीषने मिश्किल उत्तर दिल. काकूंना शिरीषच उत्तर समजलं आणि गुपचुप बाय बोलून निघुन गेल्या. “पप्पा तुम्ही बेस्ट हाऊस हसबंड आहात!” असं बोलून सगळेच हसायला लागले.

Tags:

You Might also Like

15 Comments

  1. Shalaka Doke November 11, 2020

    Khup chan🙂

    Reply
  2. Shweta Doke November 11, 2020

    Lovely

    Reply
  3. Sujata kurhade December 15, 2020

    खुप छान

    Reply
  4. Vinayak Gadekar January 27, 2021

    Husband.. can become mother of child.. 🙏🏻 Great thought 👍🏻

    Reply
  5. Fitspresso Reviews April 26, 2024

    When I originally commented I clicked the -Notify me when new feedback are added- checkbox and now each time a remark is added I get four emails with the identical comment. Is there any means you’ll be able to take away me from that service? Thanks!

    https://youtu.be/oi0bGWvxNpg

    Reply
  6. Thank you for sharing superb informations. Your web-site is very cool. I’m impressed by the details that you’ve on this site. It reveals how nicely you understand this subject. Bookmarked this website page, will come back for more articles. You, my pal, ROCK! I found just the info I already searched all over the place and simply couldn’t come across. What a perfect web site.

    https://youtu.be/4HxTCvtjM88

    Reply
  7. Sugar defender review May 8, 2024

    I’ll right away take hold of your rss feed as I can’t find your email subscription hyperlink or newsletter service. Do you’ve any? Please let me recognize in order that I may subscribe. Thanks.

    https://youtu.be/iL1uUNYr7P4

    Reply
  8. hire a hacker pro May 8, 2024

    When I initially commented I clicked the “Notify me when new comments are added” checkbox and now each time a comment is added I get four emails with the same comment. Is there any way you can remove people from that service? Appreciate it!

    https://www.tdsky.com/hire-a-hacker-for-snapchat/

    Reply
  9. Sugar Defender May 11, 2024

    Unquestionably believe that which you stated. Your favorite reason appeared to be on the net the easiest thing to be aware of. I say to you, I certainly get irked while people consider worries that they plainly don’t know about. You managed to hit the nail upon the top as well as defined out the whole thing without having side-effects , people could take a signal. Will probably be back to get more. Thanks

    https://youtu.be/nVJfIJLKOHA

    Reply
  10. Tonic Greens review May 13, 2024

    I have recently started a site, the info you provide on this website has helped me tremendously. Thank you for all of your time & work.

    https://youtu.be/IkcLvhMIfBA

    Reply
  11. Java Burn May 14, 2024

    Hello! I’ve been following your blog for a long time now and finally got the courage to go ahead and give you a shout out from Houston Texas! Just wanted to tell you keep up the fantastic job!

    https://youtu.be/pLfaZ7e9e68

    Reply
  12. Alpha tonic review May 15, 2024

    It?¦s in point of fact a nice and helpful piece of information. I?¦m happy that you simply shared this useful info with us. Please keep us informed like this. Thanks for sharing.

    https://youtu.be/8Cf4MEvEyzg

    Reply
  13. hire a hacker online May 15, 2024

    Sweet website , super pattern, really clean and employ genial.

    https://www.revtut.com/contact-us/

    Reply
  14. Prodentim May 15, 2024

    Sweet internet site, super pattern, rattling clean and utilize genial.

    https://youtu.be/qujCWdzq8is

    Reply
  15. Puravive May 15, 2024

    Hey there, You’ve done a great job. I will definitely digg it and personally suggest to my friends. I am confident they’ll be benefited from this web site.

    https://youtu.be/DEJ8KVVYO2U

    Reply

Leave a Comment