LOADING

Type to search

Share

“हे घे पेढा,” स्वप्नील पेढ्यांचा पुडा पुढे करत बोलला. “मी तुला ओळखत नाही, आईने सांगितलं आहे अनोळखी लोकांकडून काहीच घ्यायचं नाही,” श्रुतीने उत्तर दिलं. “अग! प्रसाद समजून घे. ती पहा पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे ना ती माझी आई आहे. मला चौथीची स्कॉलरशीप मिळाली ना म्हणून पेढे आणले आणि देवा समोर ठेवले. ती बोलली सगळ्यांना वाट,” स्वप्नीलने समजावून सांगितलं. “अस आहे का! अभिनंदन! मला पण स्कॉलरशिप मिळाली, आजच शाळेत समजलं. आई येत आहे पेढे घेऊन, इथले भटजी आहेत ना ते बोलले होते मला नक्की मिळणार स्कॉलरशीप,” श्रुती आनंदाने बोलली.

एवढ्यात श्रुतीची आई पेढे घेऊन आली, दोघी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन बाहेर आल्या, स्वप्नील त्याच्या आईसोबत तिथेच उभा होता. श्रुती सोबत बोलायला सुरुवात करायच्या आधी त्याची आईच बोलायला लागली, “स्वप्नील, ह्या भिसे काकू. आणि हि त्यांची गोड मुलगी श्रुती. काही महिन्यांपूर्वी आपल्या बाजूच्या सोसायटी मध्ये आले आहेत राहायला. आम्ही दोघी एकाच वेळेला बाजारात जातो, सहज ओळख झाली.” “काय ग आज मंदिरात कश्या तुम्ही दोघी?” स्वप्निलच्या आईने श्रुतीच्या आईला विचारलं. “श्रुतीला स्कॉलरशीप मिळाली, मग म्हटलं जरा दर्शन घेऊन येउयात. घे ना पेढे,” पेढे देत श्रुतीची आई बोलली. “अरे वाह! स्वप्नीलला सुद्धा स्कॉलरशीप मिळाली. तू पण घे पेढे!” स्वप्नीलची आई आणि श्रुतीची आई गप्पा मारण्यात दंग झाल्या. “आता तर खा पेढा, आता मी अनोळखी नाहीये,” स्वप्नील हसत बोलला. “हो. तू कोणत्या शाळेत आहेस?” श्रुतीने पेढा घेत विचारले. “मी विकास विद्यालय मधे. आमच्या घराच्या मागेच आहे. घंटी वाजली कि घरातून धावत निघतो, २ मिनिटांत शाळेत हजर. तु?” स्वप्नीलने विचारले. “मला पण त्याच शाळेत जायचं होत, पण सीट नव्हती मग बाबांच्या ओळखीने श्रीराम विद्यालय मधे झालं. सायकलने जावं लागत रोज. तू घरीच अभ्यास करतोस की ट्युशनला जातोस?” श्रुतीने विचारल. दोघांच्या गप्पा छान रंगल्या पण, जायची वेळ झाली. “घरी ये श्रुती. तुम्हा दोघांसाठी पार्टी करूयात. आम्ही बाकी सगळं प्लॅन करतो. इतकी मेहनत घेतली तुम्ही दोघांनी..” असं बोलत स्वप्नील आणि त्याची आई निघून गेले.

पार्टी तर जोरदार झाली, मग स्वप्नील आणि श्रुती मधे मैत्री वाढली, दोघे अभ्यासासाठी एकमेकांच्या घरी जायचे, मन लावून अभ्यास करायचे,कधी थोडा टीव्ही बघायचे,कधी काही खेळायचे. पण एकही दिवस असा जायचा नाही जेव्हा ते दोघे भेटायचे नाही. इतर कोणाची गरजच नव्हती दोघांना. दोन्ही कुटुंबांमध्ये पण छान मैत्री झाली होती, सणवार एकत्र होयचे, दोघी खरेदीला एकत्र जायच्या. एकूण सगळं छान चाललं होत. बघता बघता दोघे दहावीला पोहोचले, दोघांचे अभ्यास व्यतिरिक्त सगळी कामं बंद झाली होती. दोघांनी, आपापल्या शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, हॉटेलमधे जोरदार पार्टी झाली. “मग आता पुढे काय?” श्रुतीने विचारलं. “पुढे काय? सगळं सेट आहे माझं. ११-१२ आमच्याच शाळेत करणार मग मेडिकल कॉलेज मध्ये जाणार, मग एम. डी करणार,” स्वप्नीलने सहज उत्तर दिलं. “मी तर जाणार मुंबईला. जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्स मधे. मला आर्किटेक्ट व्हायच आहे,” श्रुतीने खुश होऊन उत्तर दिल. “तू मला सोडून जाणार? आधी का नाही काही बोललीस. अस अचानक नको ना जाऊस!” स्वप्नील थोडा उदास झाला. ” सॉरी. पण आपण ह्या विषयावर कधी बोललोच नाही. आणि मी थोडी पूर्ण आयुष्य इथेच राहणार होती. मुलींना लग्न झाल्यावर जावच लागत,”श्रुती तिचे केस सावरत बोलली. “आणि मुलगा तुझ्या घराजवळच राहत असेल तर?” स्वप्नीलने विचारलं. “ते सगळं पुढे. आधी शिक्षण पूर्ण करायचं मग स्वतःचं काहीतरी नाव कमवायचं. मग लग्न वैगेरे,” श्रुतीने उत्तर दिलं आणि हात धुवायला गेली. “असं सगळं प्लॅन नाही करता येत श्रुती. मी कुठे प्लॅन केलं होत तुझ्या प्रेमात पडायचं, पण झालं आता,” स्वप्नील तिला बघत राहिला आणि मनातल्या मनात हसला.

श्रुती गेली खरी मुंबईला पण तिला अजिबात करमेना. सारखी स्वप्नीलची आठवण सतावत होती, पण तिने ठरवले होत खंबीर राहायचं. अभ्यासात झोकून गेली होती ती. स्वप्नीलला सुद्धा श्रुतीची आठवन यायची, सारखे तिचे भास होयचे, त्याच्या आईला समजले होते त्याचे काय होत होते. दिवाळीच्या सुट्टीला श्रुती घरी आली आणि घरात बॅग ठेवून आधी स्वप्नीलला भेटायला गेली, त्यांच्या घराला कुलूप होतं, चिडून घरी आली. “त्याच्या मामाच्या गावी गेले आहेत सगळे काल. १५ दिवसांनी येतील,”श्रुतीच नैराश्य बघून तिची आई बोलली. मग काय दोघांची भेट झालीच नाही. श्रुतीची सुट्टी संपली आणि स्वप्नील मामाच्या गावाहून आला. “श्रुती आली होती अरे. तुला विचारत होती. खूप आठवण काढली तुझी. पण फोन कर बोलले तर नाही करणार असं म्हणाली,” श्रुतीची आई स्वप्नीलला बोलत होती. “हि टोपी आणली आहे तिने तुझ्यासाठी, बोलली खूप उन्हात फिरत असेल त्याला सांग टोपी ठेवत जा डोक्यावर,” टोपी देत श्रुतीची आई बोलली. ” काकू मी ही फाईल बनवून घेतली होती श्रुतीसाठी तिचे कामाचे पेपर्स ठेवायला, तुम्ही द्याल का तिला?”स्वप्नीलने उदास होऊन फाईल दिली.

श्रुती जेव्हा घरी जायची तेव्हा नेमका स्वप्नील बाहेर असायचा. तीन वर्ष त्यांची गाठ झालीच नाही, दोघांच्या आईंना मात्र त्यांची तळमळ जाणवत होती. स्वप्नीलने मेडिकल कॉलेजचे फॉर्म भरले होते, सुदैवाने त्याचा नंबर मुंबईच्या कॉलेजला लागला होता, त्याचा विश्वासच बसत नव्हता, त्याचा आनंद आज गगनात मावत नव्हता. लवकरच सगळी तयारी झाली आणि, स्वप्नील सुद्धा मुंबईत दाखल झाला. लाल गुलाब हातात घेऊन, तो श्रुतीच्या कॉलेजमधे पोहोचला. गेट जवळ तिची वाट बघत उभा होता, “स्वप्नील” …. श्रुती धावत त्याच्या दिशेनी आली, त्याला घट्ट मिठी मारली. “मला वाटलंच नव्हतं मला तुझी इतकी आठवण येईल. किती वर्षांनी भेटलास आज. किती प्रयत्न केला तरी तुझी आठवण कमी झाली नाही. आईला फोन पण केला तरी तुझ्याच गप्पा मारायचे. आपला प्लॅन चुकीचा होता स्वप्नील, एकमेकांना अजिबात फोन आणि मेसेज नाही करायचा प्लॅन खूप चुकीचा होता, इतकं काही करियर वर फोकस थोडे करायचं असत!” श्रुतीने एका श्वासात सगळं सांगून टाकलं. स्वप्नील हसत होता, तिला एकटक पाहत होता, “हे घे श्रुती, तुझ्यासाठी फुलं. तू बोलायची ना! तुझा हिरो तुला काहीच कळू न देता एक दिवशी येईल, तुला छान सरप्राईस देईल, बघ मी आलो. आणि तो फालतू प्लॅन तुझाच होता. पण तुझ्या शब्दांचा मान ठेवला. माझा एक क्षण सुद्धा असा नाही गेला, कि तुझी आठवण नाही आली. म्हणून मी खूप अभ्यास केला आणि मला टॉप मेडिकल कॉलेज मधे दाखला मिळाला,” स्वप्नील खुश होऊन बोलला. “मस्तच. खरं सांगु? तुझी इतकी सवय लागली होती, कि त्याचं प्रेमात कधी रूपांतर झालं समजलंच नाही मला. पण वाटलं तुला असं काही नसेल वाटत तर काय करणार मी, म्हणून असा प्लॅन केला होता,” श्रुती बोलली. “अग वेडे! मी तर आपण पहिल्यांदा मंदिरात भेटलो होतो ना तेव्हा पासूनच तुझ्या प्रेमात होतो, म्हणजे पाचवी पासून. पण तू खूप गोड मुलगी आहेस, आणि ते बालिश वय होत. ते काय होत माहीतच नव्हतं. तू गेल्यावर समजलं कि ते प्रेम होत आणि ते खूप खूप वाढलं. बघ आता तुला कुठे जायची गरज नाही. मीच आलो तुझ्याकडे,” स्वप्नीलने श्रुतीचा हात हातात घेऊन तिला सांगितले. श्रुतीने फुलं घेतली, दोघे खूप खुश होते. म्हणतात ना प्रेमाची पहिली पायरी मैत्रीची असते, खरं बोलतात.

Tags:

14 Comments

  1. Dr. Deepak Gaikwad September 16, 2020

    खूप छान लिखाण, keep it up.

    Reply
  2. Sheetal September 16, 2020

    योग्य निर्णय..स्वागत आहे अशा प्रेमाचे
    विचार लिहीणारऱ्या मैत्रीण चे,👌😊

    Reply
  3. Shalaka Doke September 16, 2020

    Khup chan

    Reply
  4. Vinayak Gadekar September 18, 2020

    Love in Air ❤️😊👌🏻

    Reply
  5. Deepali Ghag October 4, 2020

    Mstt👌👌

    Reply
  6. Prostadine April 22, 2024

    I very thankful to find this website on bing, just what I was looking for : D too saved to my bookmarks.

    https://youtu.be/7CYwxrHhpOM

    Reply
  7. Fitspresso April 26, 2024

    I conceive this site holds very superb written written content posts.

    https://youtu.be/-EMpMd2PSNE

    Reply
  8. pineal xt review April 28, 2024

    Thank you for sharing superb informations. Your site is very cool. I’m impressed by the details that you have on this blog. It reveals how nicely you perceive this subject. Bookmarked this website page, will come back for more articles. You, my pal, ROCK! I found simply the information I already searched everywhere and just couldn’t come across. What a perfect web-site.

    https://youtu.be/hEIMk2D7hRc

    Reply
  9. Tonic Greens May 1, 2024

    Thank you for another great post. Where else could anyone get that type of info in such an ideal way of writing? I’ve a presentation next week, and I am on the look for such information.

    https://youtu.be/iyP0Yjm9xgo

    Reply
  10. Herpesyl May 10, 2024

    Very interesting topic, regards for putting up.

    https://youtu.be/PwYQcSywoMs

    Reply
  11. Tonic Greens review May 13, 2024

    Simply a smiling visitor here to share the love (:, btw outstanding style and design. “Better by far you should forget and smile than that you should remember and be sad.” by Christina Georgina Rossetti.

    https://youtu.be/IkcLvhMIfBA

    Reply
  12. Hi there! This post couldn’t be written any better! Reading through this post reminds me of my previous room mate! He always kept talking about this. I will forward this article to him. Pretty sure he will have a good read. Thank you for sharing!

    https://www.tdsky.com/

    Reply
  13. Sight Care reviews May 15, 2024

    Good write-up, I am normal visitor of one?¦s site, maintain up the nice operate, and It’s going to be a regular visitor for a lengthy time.

    https://youtu.be/rq5Lzptk5YY

    Reply
  14. cbd May 16, 2024

    What i don’t understood is in truth how you are now not really a lot more smartly-preferred than you may be now. You are very intelligent. You understand therefore significantly in the case of this topic, produced me for my part imagine it from numerous varied angles. Its like women and men aren’t interested except it is one thing to accomplish with Girl gaga! Your own stuffs outstanding. At all times deal with it up!

    https://uweed.ch/fr/

    Reply

Leave a Comment