“तू अशी काय करतेस प्रिया? सचिन किती चांगला मुलगा आहे. किती भाव खातेस तू. मी असती तुझ्या जागी तर आता पर्यंत लग्न केल असत त्याच्यासोबत,” स्नेहा (प्रियाची चुलत बहीण) हसली. “तुला काय जात दात काढायला, आजोबांचा रोष नकोय मला. एम.बी.ए. साठी तयार झाले हीच मोठी गोष्ट आहे. मला करियर करायचा आहे. लग्न बघू, होईलच पुढे. आणि आवडतो मला सचिन, स्वतःच्या हिमतीने शिक्षण घेऊन आपल्या शहरात ३ मेडिकलची दुकान आहेत, बोलायला पण किती निर्मळ आहे, श्रीमंतीचा अजिबात गर्व नाही. साधा राहतो, नेहमी हसून असतो पण दादा सोबत जे झाल ते नकोय मला,” प्रियाने स्नेहाला सांगितलं.
सचिन सोबत शेवटच बोलून ६ महिने झाले, प्रिया तिच्या एम.बी.ए च्या शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षाची तयारी करत होती. दिवसभर ती अभ्यासानी घेरलेली असत . घर ते कॉलेज आणि कॉलेज ते घर एवढच, कुठे जायची नाही, कोणाशी बोलायची नाही. आज परिक्षेचा शेवटचा पेपर, प्रिया खूप खुश होती, तिला कॉलेज मधून नोकरी लागली सुद्धा होती. पेपर संपल्यानंतर मैत्रिणींसोबत कॅफे मधे गेली आणि भरपूर गप्पा गोष्टी केल्या. जेव्हा घरी आली तेव्हा आजोबा पण खुश होते, नातीने मेहनत करुन शिक्षण पूर्ण केला, नोकरीला लागली, त्यन्ना खूप अभिमान वाटत होता तिचा.
आजोबानी प्रियाला जवळ घेतल, गालाचा मुका घेतला, प्रियाला लहानपणीचे दिवस आठवले, खुश झाले आजोबा कि गालाचा मुका घेत. ” प्रिया बाळा आता माझ ऐक. तुझ्या मनाप्रमाणे आम्ही सर्वांनी तुला शिक्षणासाठी पाठिंबा दिला, तु मन लाउन शिकलीस, चांगले मार्क मिळविले. आता मला वाटते कि आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधून तुझे हात पिवळे करावे.. म्हणजे घाई नाहीये पण शोधायला हरकत नाही ना? मुलगा मिळेपर्यंत तु तुझी नोकरी कर. मी तुझ्यासाठी एकदम राजबिंडा मुलगा बघतो. चालेल तुला?” आजोबान्नी विचारले. प्रिया थोडा वेळ शांत होती मग बोलली, ” चालेल आजोबा. काहीच हरकत नाही. पण मी लगेच लग्न नाही करणार, भेट झाल्यावर कमीतकमी ६ महिने तरी मी त्याला निट पारखून घेइल. आमचे स्वभाव जुळतात कि नाही, आवड निवड जमतात का हे सगळ बघून मगच करेल,” प्रियाने स्पष्ट सांगितले. आजोबा हसले, ” हो ग माझ्या बाळा.”
प्रियाचे घरचे तिच्यासाठी उत्तम स्थळ शोधायला लागले आणि प्रियाने नोकरी चालू केली. २-३ आठवड्यात एक स्थळ आले, घरच्यांना स्थळ आवडले, रविवारी बघायचा कार्यक्रम ठरला. प्रिया तयार झाली आजोबांच्या सांग्ण्याप्रमाने, आईने प्रियाला चहाचा ट्रे दिला. प्रिया थोडी घाबरली होती, पहिलीच वेळ, पण तिला ठाऊक होत आजोबाने स्थळ आणले आहे म्हणजे चांगले असेल. बाहेरच्या खोलीत ट्रे घेउन आली, तिच्या समोर सचिन बसलेला होता. प्रियाला घाम फुटला, आजोबाला सगळे समजले कि काय.. आता काही खर नाही. ” ये ये प्रिया बाळा. अग सगळ्यांना चहा दे, अशी बघत काय बसली,” आजोबांनी लाडाने प्रियाला सांगितले. सगळ्यांना चहा देउन प्रिया आजोबा शेजारी बसली.
” हा सचिन. हे त्याचे आई, वडील. सचिन ने फार्मसी मधे शिक्षण घेतले आहे. त्याचे ३ दुकाने आहेत. घरातील सर्व जबाबदारी घेतली आहे त्याने. आई प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका आहे आणि वडील बॅंकेत मॅनेजर आहेत. मुलगा निर्व्यसनी आहे. स्वभाव प्रेमळ आणि मनमिळाऊ आहे. आता तुम्ही पुढच बोला.” आजोबाने सचिनची सर्व माहिती सांगितली सगळ्यांना. प्रिया खुश झाली, सचिनकडे बघून गालातच हसली. सगळ्यांनाच सचिन आवडला. ” तर मला वाटतय कि सगळ्यांना स्थळ आवडले आहे. तर आता एक गम्मत सांगतो. वर्षभरापुर्वी हा मुलगा माझ्याकडे आला होता, प्रिया ह्याला खूप आवडते म्हणून. तो तिच्यासाठी थांबायला तयार होता, म्हटलं घेउ ह्याची परीक्षा. मुलगा पास झाला.. आणि प्रिया तु सुद्धा पास झाली बर.” आजोबा मिश्किल हसले. प्रिया लाजली.
” आता अजून एक सर्प्राईज आहे सगळ्यांसाठी. सगळ्यान्नी डोळे मिटा,” आजोबन्नी सुचना दिली तसे सगळ्यांनी डोळे मिटले. दारात धीरज (प्रियाचा चुलत भाऊ), त्याची बायको आणि त्यांचा मुलगा उभे होते. त्याला बघून सगळ्यांचा आनंद दुप्पट झाला. ” मागच्या वर्षी सचिन सोबत बोल्ल्यावर मला धीरजची आठवण आली, त्याच्या सोबत मी वाईट वागलो. धीरजची माहिती काढली आणि त्यावर पाळत ठेउन होतो. धीरज खूप प्रामाणिक राहून त्याचे काम करतो आणि त्याची बायको म्हणजेच माझी नातसून सुद्धा सोन्यासारखी संसार करते. धीरजनी आठ वर्षापूर्वी चूक केली होती, पण ति वेळ चुकीची होती, धीरज आणि माझी नातसून चुकीचे नव्ह्ते. माझी नातवंडे माझा अभिमान आहेत. सग्ळ्यान्नी एक लक्षात ठेवा, माणसे कधीच चुकीची नसतात, वेळ चुकीची असते. आजपासून हे तिघे आपल्यासोबत राहतील. आणि प्रिया, लवकरच तुझी वाहिनी तुला मुंडावळी बांधेल… काय जमेल ना? ” आजोबाने सगळ्यांना विचारले. सगळे खूप हसले.
Mast
Thank you Pranali
Khup chan, wachun smile aali chehryawar, aani positive watla khup.
Thanks a lot dear
Chan
Thank you