“मागच्या आठवड्यात प्रिया चा वाढदिवस होता, ह्या वर्षी तिला सेलिब्रेशन करायचे नव्ह्तं, मग आम्ही ठरवले कि ह्या वर्षी अनाथ आश्रमात थंडीचे कपडे देउ. कर्जतला एका अनाथ आश्रमात गेलो, पूर्ण आश्रमाची टूर घेतली आणि ऑफिस मधे बसलो होतो आश्रमाच्या मालकीणची वाट बघत. समोरून अनुष्का चालत आली. आम्ही दोघे खूप खुश झालो तिला पाहून, प्रियाने तर तिला मिठीच मारली. पण अनुने आम्हाला पण तोच प्रश्न विचारला. थोडा वेळ शांत बसून होतो आम्ही, मग समजले कि अनुष्काने एका अपघातात दोन्ही डोळे गमावले होते. लास्ट इयरला तिच्या वडिलांना हार्ट- अटॅक आला होता आठवते का? काका एका आठवड्यात वारले, आईच्या मायेची तर अनुष्का लहानपणापासूनच पोरकी होती. तिला तिची मावशी घेऊन गेली, नाही बोलूच शकली नाही अनु तिला. लास्ट इयरची परीक्षा दिली तिने बाहेरून. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी बसने घरी जात असताना एका टॅंकरला बस धडकली आणि अनुच्या डोळ्यांत काचा जाऊन तिची दृष्टी कायमची गेली.” साहिल बोलत होता, त्यांच्या दोघांचे डोळे भरून आले होते. एवढ सगळ झाल आणि आपण फक्त इतकी वर्ष अनुष्काच्या नावाने खापर फोडत बसलो. पुढे काय झाले हे ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्ह्ता तो. नको त्या विचारांनी डोक्यात काहूर मांडले. १० वर्ष झाले होते पण अनुष्कावरचे प्रेम एक तसूभरही कमी झाले नव्हते. तो तिच्याकडे निर्विकारपणे पाहत होता, आपण किती मुर्ख आहोत ह्याची जाणीव झाली त्याला. म्यूजिक थांबल होत, सगळे जेवण करत होते पण रितेशच्या पायात त्राणच नव्हते. सगळी तहान- भूक विसरला होता तो. अनुष्काला सगळ्यांनी घेरले होते, अनु सगळ्यांची फेवरेट होती. साहिलने रितेशला ओढत आणले, रितेशने अनुष्काचा हात हातात घेतला, तिच्या हातावर त्याचा ओघळनारे आश्रू पडले. अनुष्काने तो स्पर्श ओळखला, ” रितेश?” ती हसत बोल्ली. ” कसा आहेस तु?” तिने लगबगीने विचारले. “कसा असेल मी, इतके वर्ष तुझ्या आठवणीत जगत होतो, तुला पाहिले आणि पुन्हा आयुष्यात रंग भरले”, रितेशने हसत उत्तर दिले.
त्याने प्रियाच्या केसांतून लाल गुलाब काढला, अनुष्काच्या हातात दिला, ” अनु, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, पहिल्यांदा तुला पाहिले तेव्हापासून मी प्रेम करतो. तु मला सोडून गेलीस आणि माझं सगळे जग ब्लॅक ॲंड व्हाइट झाले. मी नाही राहू शकत आता अजून तुझाविना. लग्न करशील माझ्यासोबत?” अनुष्काचे डोळे भरून आले, “पण रितेश, मी तर अधु आहे, माझी दृष्टी पूर्ण गेली आहे, माझे ओझे होइल तुझ्यावर. तु दुसऱ्या मुलीसोबत लग्न कर, सुखी राहशील”, अनुश्का ने डोळे पुसत उत्तर दिले.” अग घरचे किती वर्ष मागे लागलेत पण माझे फक्त तुझ्यावर प्रेम आहे. एक क्षणभर सुद्धा तुझ्याविना नाही रहायचे मला. तुझं ओझ मला कधीच होणार नाही अनु. आपण दोघे लाइफचा एक नवा चॅप्टर चालू करुयात ना.” अनुष्काने रितेशचा हात घट्ट धरला “मी नेहमी तुझीच होते रितेश. मी वाट पाहत होते तुझी. मला माहित होत कि तु नक्की येशील आणि मी तुझीच होइल. तुझ्या सोबत चॅप्टर काय आक्ख पुस्तक लिहायला तयार आहे मी” मागून सगळ्या मित्रांनी ओरडून बोल्ले, ” मधली पाने आम्ही भरूच कि.”
दोघांनी घट्ट मिठी मारली. प्रेम, प्रेम असतं, तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं.
Very nice interesting story.
Khup chan 👌👌
Nice Very
Thank you
Thank you
Thank you
ऐक निखळ प्रेम कथा