LOADING

Type to search

पिंट्या- भाग २

991 Views
Share

“आज यायला उशीर झाला बाळा विपुल!” पिंट्याच्या वर्ग शिक्षिका गुपचूप वर्गात शिरणाऱ्या पिंट्याला बघून बोलल्या. “सॉरी मॅडम. मी वेळेतच निघालो होतो, पण एक कामच तसं आलं,” पिंट्याने खाली मान घालून उत्तर दिले. “हो का? असं काय महत्वाचं काम होत कि तुला शाळेत यायला १ तास उशीर झाला?” मॅडम जरा चिडून बोलल्या. “ते काय आहे ना, आमच्या शेजारी एक आजोबा राहतात, मी सकाळी चालत निघालो शाळेसाठी आणि ते माझ्यासमोर मॉर्निंग वॉक करताना पडले!” पिंट्याने जरा धीराने उत्तर दिले. “हो का? बरे आहेत का ते आजोबा आता?” मॅडमने काळजीच्या स्वरात विचारले. “म्हणजे काय! मी त्यांना हात दिला, उचलून हळूच त्यांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवले. म्हणून तर उशीर झाला ना मला! पुन्हा असं नाही होणार,” पिंट्याने अगदी गुणी बाळा सारखं उत्तर दिलं. “तू तर एकदम छान काम केलंस. ऐका सगळ्यांनी विपुल सारखं बना, किती हुशार आणि गुणी आहे तो. अशी मदत आपण नेहमी केली पाहिजे आपल्या शेजाऱ्यांना,” मॅडमने पिंट्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि पिंट्या गालातल्या गालात हसला. ‘मॅडमला काय माहित मला उठायला उशीर झाला आणि अंघोळ करताना मी आईला भिजवलं म्हणून मला उशीर झाला…. जाऊ दे शिक्षा तर नाही मिळाली ना…’ पिंट्या बाकड्यावर बसला.

शाळा सुटल्यावर पिंट्या थेट घरी गेला. कपडे बदलून, दोन-चार घास नाष्टा करून दूध पिऊन मैदानावर धूम ठोकली त्याने. आजोबा नेहमी सारखे बाहेर बसले होते, त्यांना पाहून त्याला शाळेतला किस्सा आठवला, “ओ आजोबा. बरे आहेत ना? कुठे पडले नाही ना आज? काळजी वाटते म्हणून विचारलं,” पिंट्याने उगाच डोकं खाजवत विचारलं. “हो हो! मी ठणठणीत आहे. तू उगाच माझी चौकशी नाही करणार, तुला काय मी आज ओळखतोय? सांग गुपित काय आहे?” आजोबांनी विचारलं. “काही नाही आजोबा, आज मला शाळेत जायला उशीर झाला, मॅडम खूपच भडकल्या होत्या माझ्यावर. मग माझा मार वाचवायला मी त्यांना सांगितलं की तुम्ही घसरून खाली पडलात आणि मी तुम्हाला मदत केली म्हणून मला उशीर झाला. मग माझी खूप स्तुती झाली, मॅडमने तर पोटभर माझं कौतुक केलं,” पिंट्या एकदम खुश होऊन सांगत होता. “अर्रे वाह! तू तर एकदम कोल्हा आहेस रे. कोण मॅडम तुझ्या? किती भाबड्या आहेत ना?” आजोबांनी भुवया उंचावत विचारले. “कुलकर्णी मॅडम. छान आहेत. आम्हाला गणित शिकवतात,” विपुलने उत्तर दिलं आणि पळाला तिथून.

दुसऱ्या दिवशी सकाळी पहिलाच वर्ग कुलकर्णी मॅडमचा होता, पिंट्या जागेवर बसून वहीत काहीतरी गिरवत होता. इतक्यात मॅडम आल्या आणि पिंट्याचे कान धरले. “खोटं बोलतोस काय? आजोबा पडले होते का काल? आणि तू त्यांना मदत केलीस? हेच का ते आजोबा? हे तर म्हणतायेत त्यांना काहीच झालं नाही आणि कित्येक वेळा तू त्यांना पाडायचा प्रयत्न केलास?” “दुखतंय ना मॅडम!” पिंट्या कळवळून ओरडत होता. त्याला वाटलंच नव्हतं आजोबा शाळेत येऊन त्याच्या मॅडमला सगळं खरं सांगतील. “सॉरी मॅडम,” पिंट्या मान खाली घालून बोलला. “सॉरी काही नाही. उद्या तुझ्या आई-वडिलांना शाळेत बोलव, हेडमास्टर आणि मी बोलावलं आहे असं सांग,” मॅडम रागात बोलल्या. पिंट्या रडायला लागला, “नको ना मॅडम मी पुन्हा कधीच खोटं नाही बोलणार, जाऊ द्या ना प्लिज,” बिचारा कळवळून रडत होता, पण मॅडमने त्याच ऐकलं नाही. आजोबा कोपऱ्यात उभे राहून मिश्कीलपणे हसत होते. त्यांना पाहून पिंट्याने ठरवलं आजोबाला अद्दल घडवायची. दुसऱ्या दिवशी पिंट्याचे आई-वडील शाळेत आले, झालेला किस्सा कुलकर्णी मॅडमने त्यांच्या कानावर घातला. पिंट्याला हेडमास्तरांनी शिक्षा केली, ती अशी होती की त्याला पूर्ण एक आठवडा अर्धा तास आधी येऊन वर्गाची साफसफाई करायची आणि बोर्डावर तारीख आणि सुविचार लिहायचा. ही शिक्षा कमी वाटली आई-वडिलांना म्हणून त्यांनी एक आठवडा पिंट्याचं बाहेरचे खेळ बंद केले, टी. व्ही सुद्धा बंद.

पुढच्या भागात वाचूयात नक्की काय केलं पिंट्याने आजोबांवर सूड उगवायला.

Tags:

5 Comments

  1. pranali August 14, 2020

    waiting for part 3…

    Reply
  2. Vinayak Gadekar August 14, 2020

    😂😂 Revenge 🤺🤼‍♂️🏹🎣

    Reply
  3. Shalaka Doke August 15, 2020

    Nice😄

    Reply
  4. Kerry February 7, 2025

    Heyy very nioce wweb site!! Maan .. Beautiful .. Wonderful ..
    I wil bookkmark your website aand take tthe feeds also?
    I’m hapoy tto search out a lot of elpful informmation here
    inn the post, wwe nneed deevelop more twchniques oon thos regard, thankls ffor sharing.
    . . . . .

    My homepage: xxxxlulu

    Reply
  5. Sommer February 8, 2025

    Magnificent site. Plenty off useful information here.

    I’m sending iit to a few pals anss also sharing inn
    delicious. Annd obviously, thanhks for your sweat!

    my page xnxx hub

    Reply

Leave a Comment