एवढ्यात अनघाचे पप्पा आले खोलीत आणि गालावरुन खाली ओघळनारे अश्रू त्यांनी हातात घेतले, ” काय ग अनघा अस रडतात का बाळा, मि जरा टेंशन मधे होतो आणि तु मधेच बोल्लिस. तुला माहित आहे आजवर तुला मि कधीच ओरडलो नाही. आज चुकून झाल, माफ करना पप्पाला.” अनघा पप्पाला बिलगुन अजुनच जोरात रडायला लागली, ” पप्पा काही काय बोलता तुम्ही! जेवले का तुम्ही? ” अनघाच नाक रडून अजुनच लाल झाल होत. ” अग आज सगळे तुला तुझ्या आवडीचे पदार्थ भरवणार आहेत, अगदी लहानपणी भरवायचे ना तसे, एक घास आजीचा, एक आजोबाचा, एक मम्मीचा, एक दादाचा….. भरपूर भूक ठेव तु. ” बोलता बोलता पप्पांचे पण अश्रू अनावर झाले, अनघाने ते हातात झेलले. ” अग मेहेंदी खराब होईल ना वेडाबाई. ” पप्पा बोल्ले आणि अनघाच्या हातवरची मेहेंदी बघू लागले, ” अनघा किती रंगली आहे तुझी मेहेंदी! बाहेर बायका बोलत होत्या मेहेंदी खुप रंगली म्हणजे नवर्याच खूप प्रेम अस्त. मज्जा आहे एका मुलीची” चेष्टा करत पप्पा हसले. ” काही बोलता तुम्ही, तुमच्या पेक्षा जास्त ह्या जगात मला कोणीच प्रेम करु शकत नाही,” अनघाने नाक मुरडत उत्तर दिले. ”
आता बोलते आहेस लग्न झाल्यावर कळेलच आम्हाला.” ” आणि एक गोष्ट बाळा, मी एवढंस ओरडलो तुला तर तु इतकी रडलीस, उद्या सासरी जाशील, तुझे सासु- सासरे, नवरा काही बोल्ले तर अशीच रडत बसू नकोस. आता जरा स्ट्रोंग हो, सगळ्यांची काळजी घे, तु दोन्ही कुटुंबातील ब्रिज आहेस, दोन्ही कुटुंबाला सांभाळायचे आहे. आम्हाला किंवा त्यांना कधीच दुखवू नकोस,” पप्पांनी लेकीला चार गोष्टी समजावून सांगितले. ” पप्पा आता तर मला बाळा बोललात आणि लगेच एवढी मोठी जबाबदारी सोपावलीत?” अनघा चिडून बोलली. ” असच असतं ग मुलींचं, सगळ्यांच्या हृदयात जागा निर्माण करतात, ति जागा कोणीच भरु शकत नाही,” पप्पांच बोलणे संपतच होते तेव्ढ्यात अनघाची मम्मी आली, ” चला आता तुमच्या चिउला घास भरवायला सगळे थांबले आहेत.” तिघांनी मिठी मारली, मम्मी पप्पानी अनघाला उचलून घेतले आणि जेवायला घेउन गेले.
Khup Chan Lihilay Tai
Thank you
chan lihley…😘👌👍
भावनांचे हळुवारपणे केलेलं हृदयस्पर्शी सादरीकरण..👌
Thank you
Thank you
Mast lihilay
Thank you
Saglya ladakya lekinchya babachi kahani….ekdam perfect
Thank you so much
खुप छान